DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साक्री तहसील कार्यालयासमोर दिनांक 30 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते. या वेळी त्यांच्या उपोषणाला विविध पक्षांचे पदाधिकारी व तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला होता ५ डिसेंबर मंगळवारी रोजी त्यांची तब्बेत खालावत जात आहे हे बघून आदिवासी संघटनेच्या वतिनेही त्यांना विनंती करण्यात येत होती की, आपण आपल्या तब्येतीसाठी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे दरम्यान पाच डिसेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील,साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे,पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी उपोषण स्थळी भेट देत सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांच्याशी संपर्कात होते शेवटी उपोषणाच्या सहाव्या दिवशी 5 सप्टेंबर मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, साक्री चे तहसीलदार साहेबराव सोनवणे, साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे. याबाबतचे लेखी पत्रही प्रशासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांना देण्यात आले आहे.