DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर:- आज दि.9/10/2024 रोजी श्री संत गुणवंत महाराज मतिमंद निवासी मूकबधिर विद्यालय व स्वर्गीय एम एस निवासी मूकबधिर विद्यालय मुर्तीजापुर येथे. श्री. उद्योगरत्न डॉ. सुगत दादा वाघमारे व तिक्ष्णगत वेलफेअर सोसायटी मार्फत अपंग मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अपंग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब खांडेकर यांनी श्री डॉ. सुगत दादा वाघमारे यांचे विशेष सत्कार व स्वागत केले.
उद्योग रत्न डॉ सुगत वाघमारे हे मुर्तिजापूर मध्ये दोन वर्षांपासून सातत्याने बालक, महिला व बेरोजगारांसाठी कार्य करताना दिसत आहेत. लहान मुलांची बौद्धिक विकासासाठी कला कौशल्याच्या स्वरूपात विविध उपक्रम घेत आहेत , क्रीडा,संगीत, वकृत्व, कौशल्यावर आधारित आता पर्यंत ५० च्या वर तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी मार्फत मुर्तिजापूर येथे उपक्रम राबविण्यात आले. त्या बरोबरच मुकबधीर,मतीमंद व अपंग मुलांकरिता पण विविध उपक्रम राबविताना ते दिसत असतात. ८ सप्टेंबरला डॉ सुगत वाघमारे यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांनी अपंग मतिमंद मुलांसोबत पण त्या मुलांचा आनंद वाढविण्यासाठी त्यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला सौ. आयाताई साहेब खांडेकर संस्थेचे सचिव, उमाताई खांडेकर, गझलकार व पत्रकार मिलिंद भाऊ इंगळे, अनिल डाहेलकर व संस्थेचे सर्व कर्मचारी. श्री ऋषिकेश खांडेकर सर, कुमारी कोमल मॅडम, कुमारी अस्मिता मॅडम, रितेश खांडेकर सर, खेडकर सर, सचिन भाऊ वाडेकर, कमलेश सर, इत्यादी उपस्थित होते. व आभार प्रदर्शन अनिल भाऊ शिरसाट सर यांनी केले.