नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अमरावतीत बँकेत ठेवलेलं 5 किलो खरं सोनं अचानक झालं बनावट, महाराष्ट्रात उडाली खळबळ

प्रतिनिधी: फुलचंद वानखेडे

अमरावती : महाराष्ट्रात माजली खळबळ अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेतील सोने तारण बनावट प्रकरणात बँकेचे धक्कादायक ऑडिट पुढे आलं आहे. बँकेच्या ऑडिटनुसार बँकेत तारण ठेवलेल्या तब्बल 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्राम सोने बनावट असल्याचं समोर आलं आहे.

राजापेठ पोलिसांनी ही माहिती दिली आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बँकेत तारण ठेवलेल्या ९२ ग्राहकांपैकी 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये छेडछाड केल्याचं मान्य करण्यात आलं आहे. याचवेळी 26 लॉकरमधील दागिने सुरक्षित असल्याची बाब बँकेच्या ऑडिटमध्ये पुढे आली आहे.

59 लॉकर्समध्ये सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांच्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडले आहेत. ही चूक बँक व्यवस्थापनानेच मान्य केल्याने बँकेच्या लॉकरधारक आणि सुवर्ण तारण कर्जधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

बँकेत खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी बनावट सोन्याचे दागिने कुठून आले, यामध्ये बँकेचे कोणते अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत याबाबत बँक प्रशासन चौकशी करत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
3:57 am, December 23, 2024
20°
छितरे हुए बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!