DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित्ताने देशभरात २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असते. या दिनांचे औचित्य साधुन तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्ह्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेले व प्राविण्य प्राप्त खेळांडूचा यादिवशी पारितोषिक देवून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी दिली आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातील जानेवारी, २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेले व प्राविण्य प्राप्त खेळांडनी आपल्या प्रमाणपत्राची छायाकिंत प्रत १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे येथे जमा करावी. प्राविण्यप्राप्त खेळाडूंन २९ ऑगस्ट २०२३ रोजी सांयकाळी ४ वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमाक प्राप्त खेळांडूना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देवून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणा आहे. या कार्यक्रमांस धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांडू तसेच स्वातंत्र्त्यांच्या अमृत महोस्वती वर्षानिमित्त मैदानी क्रीडा स्पर्धेत प्रथम तीन क्रमाक प्राप्त केलेले खेळांडूनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.