DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावात ३० वर्षानंतर प्रथमच भारतीय सैनिकाद्वारे दिवाळी निमीत्ताने आजी माजी सैनिकांचा स्नेह मेळावा नुकताच हॉटेल मैत्री येथे संपन्न झाला. शेवाळी गावातील माजी सैनिकांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी आजी सैनिकांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. .स्नेह मेळाव्याचे सुत्र संचालन माजी सैनिक युवराज कोळी (वेंडाईत) यांचे चिंरजीव अनिल वेंडाईत याने केले.स्नेह मेळाव्यात सर्वांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व प्रथम आपला परिचय देत कुठल्या पदावरून सुरुवात केली व कोणत्या कोणत्या ठिकाणीं पोस्टिंग झाली आणि जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर कसे प्रमोशन प्राप्त केले या वेळी कोणत्या अडचणींचाही सामना करावा लागला या सर्व गोष्टींचा अनुभव सादर केला.देश सेवा हि सर्वोच्च सेवा आहे आपण भाग्यवान आहोत की आपल्या नशिबी हि सेवा करण्याची आपल्याला संधी लाभली असे मनोगत माजी सैनिक शशिकांत साळुंके यांनी हिंदी या भाषेत व्यक्त केले त्यांनी हिंदी भाषा हि आपली राष्ट्र भाषा असून ज्या वेळी आपण देश सेवा करीत होतो तेंव्हा त्याठिकाणी कुणी बंगाली, गुजराथी, मद्रासी, बिहारी असे अनेक राज्यांतून आपले सहकारी जवान यांचेशी संभाषण करण्यासाठीं सोयीस्कर भाषा फक्त हिंदी होती व तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हि हिंदी भाषेचा नारा दिला होता असे त्यांनी नमुद केले. आजी सैनिकांनी माजी सैनिकांचा सत्कार केल्यामुळे माजी सैनिकांनी त्यांचे या वेळी आभार व्यक्त करत हि परंपरा पुढे नेण्याचा निश्चय केला. या वेळी माजी सैनिक विजय साळुंके,युवराज कोळी, चंद्रकांत साळुंके,देविदास कोळी, ग.भा. प्रेरणा साळुंके, शशिकांत साळुंके व आजी सैनिक भाविक साळुंके, केतन साळुंके, संदिप साळुंखे, रविंद्र साळुंके यांच्यासह परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.