DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथे 13ऑगस्ट 2023 रविवारी रोजी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी बाधवांच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वृद्धानी सहभाग घेतला. त्यांनी वृक्षारोपणाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमात माया केअर फाऊंडेशन च्या स्वयंसेविका सुलताना शहा मॅडम उपस्थित राहून मदत केली. हा कार्यक्रम संस्थेच्या संस्थापिका मंजिरी जोशी मॅडम व अभय जोशी सर, मदतनीस वंदना साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी माया केअर फाउंडेशनच्या स्वयम सेविका सुलताना शहा यांनी हे फाउंडेशन राज्यभर योजना राबवित असून खास करून वृद्ध लोकांसाठी मदत व सहकार्य करीत आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी शेवाळी गावातील उत्तम माळचे, अरुण माळचे, रामा बागुल, सुपडू माळचे, लखन पवार, प्रल्लाद पवार, इसा शहा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.