DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- ‘पंगत चुकली तर जेवण चुकते व संगत चुकली तर आयुष्य चुकते’ या उक्तीचा आयुष्यात प्रत्यय येतो म्हणून विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करत महाविद्यालयीन जिवनात राहिले पाहिजे असे प्रतिपादन निजामपूर ता. साक्री पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी केले.ते निजामपूर येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ, वरीष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंच तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा व भरती या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक बारीक पगारे होते.
स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांनी अकारण भिती बाळगू नये, परीक्षा आहे म्हणून विचार करण्यापेक्षा आतापासूनच प्रत्यक्ष अभ्यासाला लागा. तुमचे अभ्यासातील सातत्य तुम्हाला यशापर्यंत नेणार आहे. महाविद्यालयीन जिवन अभ्यासकांसाठी आहे, असाध्य ते साध्य करण्याची तयारीसाठी आहे. अभ्यास केला तरच भविष्य घडणार आहे. आयुष्यातील परिस्थितीला कोणत्याही कारणाने लागलेली किड संपवायची असेल तर चांगली संगत व चांगला अभ्यास करा. पुस्तकाशी मैत्री करा असे आवाहन श्री मयूर भामरे यांनी पुढे बोलताना केले व पोलीस, पीएसआय भरती प्रक्रिया बाबत सखोल मार्गदर्शन केले. बारीक पगारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजा करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बी.आर.गावित यांनी केले. प्रमुख वक्ते मयूर भामरे यांचा परीचय जे.के.शाह वरीष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमास विद्यार्थी विकास मंचचे प्रमुख मनोहर राणे, उपप्राचार्य ए. एस. भदाणे, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाठ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाँ.जे.डी.चिंचोले यांनी केले. उपस्थीतांचे आभार एल. आर. अहिरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन जे.के. शाह आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. शरदचंद्र शाह यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य बी.आर. गावीत व विद्यार्थी विकास मंच समितीने केले.