DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- रविंद्र गवळे
नंदुरबार :- वडाळी (ता. शहादा) येथे सुभाष खंडू चौधरी वय (58) यांनी फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असून, काही वर्षांपूर्वी त्यांचे अपघातात पाय निकामी झाल्याने त्यांना अपंगत्व आले होते. परिवार चालवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. गेल्या काही दिवसापासून ते आर्थिक विवचनेत होते. त्यातच त्यांनी काही फायनान्स कंपन्यांकडून अतिरिक्त व्याजदरावर कर्ज देखील घेतले असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ते नेहमी तणावात रहायचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी रात्रंदिवस पत्नी मजुरी करत होती. पण हप्ते भरता येत नसल्याने तसेच फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी हप्त्यांसाठी त्यांच्याकडे तगादा लावल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे त्यांनी (दि.14) मंगळवारी संध्याकाळी एकटे असताना आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवली असलेल्याचे सांगितले जात आहे. रात्री त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. किशोर चौधरी यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांच्या आदेशावरून असई गिरधर माळीच हे पुढील तपास करत आहेत.