⭐ DPT NEWS NETWORK ⭐ . ✍️ 🗞️दर्शन पोलीस टाइम 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भाडणे तालुका साक्री जिल्हा धुळे. येथील उपक्रमशील सहाय्यक शिक्षिका श्रीमती मालती काशिनाथ सोनवणे शाळेतील विद्यार्थिनींची गुणवत्ता वाढवण्यासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतात. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाकरता उपक्रम हा इंग्रजी विषयासाठी राबविण्यात येत आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा असली तरीही इंग्रजी भाषेचे महत्व अनन्य साधारण असे आहे. इंग्रजी विषय म्हटला की सर्वच विद्यार्थी त्यापासून दूर पळतात. त्यामुळे इंग्रजी विषय आपलासा वाटावा. व विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी रस निर्माण करावा यासाठी ‘इंग्रजी वर्ड बँक’ संकल्पना राबवून त्याद्वारे इंग्रजी शब्द संपत्ती वाढवण्याकडे लक्ष देण्यात आले. याकरीता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून विद्यार्थिनी वेगवेगळे similar words, Opposite words, name of animals, name of body parts असे वेगवेगळे topic घेऊन दररोज चार ते पाच शब्द लिहतात. महिनाअखेरीस 100 ते 150 शब्द वहीत जमा होतात. या शब्दांची काठीण्य पातळी वर्गानुसार वेगवेगळी ठरवली जाते.व त्या महिन्याच्या तीस तारखेला 10-15 मिनीटांचा अलार्म लावून शब्द लिहून काढतात.या पद्धतीने उपक्रमाचे मूल्यांकन देखील केले जाते. दिलेला वेळेतच कोणी किती शब्द लिहिले त्यावरून इयत्ता सहावी ते दहावी या वर्गातून प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक घोषित करून त्यांची नावे फळ्यावर लिहून पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपला त्यांची प्रसिद्धी दिली जाते. यातून विद्यार्थिनींचा उत्साह वाढतो. व पालकांनाही समाधान वाटते. आणि मागील एक वर्षापासून सतत वर्षभर हा उपक्रम आजपर्यंत सुरु आहे. मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्यात रूपांतरण करण्यासाठी इंग्रजी शब्द पटकन सूचणे गरजेचे असते. इंग्रजी शब्द संपत्ती चांगली असेल तर इंग्रजीची भीती वाटणार नाही. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम गेल्यावर्षभरापासून राबवण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थिनी उत्साहाने उपक्रमात सहभागी होतात. व इंग्रजीच्या तासिकेला पटापट उत्तर देखील देतात. या उपक्रमाला समाजकल्याण सहा.आयुक्त सुंदरसिंग वसावे, शानिशा अधिकारी सैंदाणे, निवासी शाळेचे मुख्याध्यापक चेतन हिरे यांचे मार्गदर्शन लाभले.