DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- दिप्ती पाटील
उरण : – भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआय, रासप मित्रपंक्षाचे शिंदे गटाचे ३३ मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा. श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रच्यारार्थ उरण जेएनपीटी मल्टी पर्पस हाॕल मध्ये महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्याचा मेळावा संपन्न झाला.
![](https://dpolicetime.com/wp-content/uploads/2024/04/img_20240407_1246027890167020668996932-1024x473.jpg)
![](https://dpolicetime.com/wp-content/uploads/2024/04/img_20240407_1243342519690674918653061-1024x473.jpg)
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गटाचे) मा. श्री श्रीरंग आप्पा बारणे यांना महायुतीकडु उमेदवारी देण्यात आली आहे. मा. बारणे साहेबांची तिसरी वेळ आहे. धनुष्यबाण हि त्याची निशाणी आहे. विकासपर्व संसद पुरस्कार प्राप्त झालेले मा. श्री बारणे साहेब यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामे केली .त्यात मुख्य पनवेल येथील विमानतळ, मुंबई ते खारघर पनवेल मार्गावरील मेट्रोचे पहिल्या टप्यातील काम सुरू केले,उरण रेल्वे प्रकल्प पूर्ण केले,उरण पनवेल जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करून वाहतुकिची समस्या सोडविली,कार्ला, भाजे,एलिफंटा लेणी या किल्याच्या सर्वधनासाठी राज्य सरकार कडून निधी आणला.कामासाठी विविध प्रक्रिया सुरू केल्या डोंगरवाई,धनगरपठार,या ठिकाणी विज पोचवली अशी अनेक कामे बारणे साहेबांनी केली आहेत.त्यामुळे ते बहुमताने निवडून येतील यात शंकाच नाही.
या मेळाव्यात रायगडचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री मा.उदय सामंत साहेब यांनी रायगड मधील शेतकर्यावर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याचे मत व्यक्त केले.मग तो सिडकोचा नैना प्रकल्प असो किंवा ,एमएमआरडी असो.
उरणचे आमदार मा.महेश बालदी साहेबांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पनवेल येथील विमानतळाला दिबांचे नाव देण्याची खात्री दिबांचे चिरंजीव श्री अतुल पाटील यांना आहे.
मेळाव्यात उपस्थिती उमेदवार मा.बारणे, पालकमंत्री मा. उदय सामंत उरणचे आमदार मा.महेश बालदी,पनवेल खासदार मा. रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकुर यांनी भाषणात विजयाचा दावाच केला आहे.