DPT NEWS NETWORK 🗞️✍️
जालना: कवयित्री पूनम सुलाने-सिंगल यांचा पहिला मराठी काव्यसंग्रह ‘ऋतुस्पर्श’ लोकार्पण दि.16 ऑगस्ट 2023 कवियत्री पूनम सुलाने यांचे वडील कै.विठ्ठल महासिंग सुलाने यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जि. प. प्रा. शाळा, गोकुळवाडी ता. जाफराबाद जि. जालना या ठिकाणी डॉ. सुरेखाताई लहाने जाफराबाद नगराध्यक्षा तसेच माजी चेअरमन शिक्षक पतसंस्था जाफराबाद श्री सुखदेव अवकाळे डॉ. कैलास देशमुख, कवी, लेखक श्री सुधाकरसिंह चींधोटे साहित्यसंघ जाफराबाद चे अध्यक्ष श्री दत्तात्रय गवळी,ज्येष्ठ साहित्यिक शिवसिंग डोंगरजाळ, सरपंच शिवाजी भिसे, परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली जनेश्वर आश्रम जवखेडा, श्री संजीव सिंगल, आर्मी, कवयित्री पुनम सुलाने यांच्या हस्ते थाटात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून सरस्वती पूजनाने झाली.
साहित्यसंपदा प्रकाशन द्वारे ‘ऋतुस्पर्श’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला, मुख्याध्यापक श्री उमेश दुनगहू, प्राचार्य श्री कैलास टाले,श्री गजानंद बोहरा, तहसीलदार रवी सतवन,बदामसिंग सतवन,प्रतापसिंग सुलाने,जितेंद्रसिंग जारवाल,चैनसिंग सुलाने, मुख्याध्यापक मनोज मुरकुटे, पत्रकार राजू बोरकर, न्यू हायस्कूल शिक्षक मुरकुटे सर, गावातील प्रमुख नागरिक, इतर शासकीय कर्मचारी, शिक्षक, मित्र मंडळ उपस्थितीत होते, यावेळी सासर आणि माहेर यांचे एकाच वेळेस नावलौकिक करणाऱ्या “कवयित्री पुनम सुलाने यांचा जीवन प्रवास मी प्रत्यक्ष पाहिला असून फक्त आपले गाव, तालुक्याचेच नाही तर महाराष्ट्राचे देखील नाव राष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या आणि आपल्या पुस्तकाचे प्रकाशन हे आपल्या मातृभूमीतच व्हावा असा हट्ट करून तो पूर्ण ही करणाऱ्या मातीशी नाळ जोडलेल्या कवयित्री पूनम सुलाने यांचा आम्हाला खूप अभिमान आहे” असे मत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दादाराव सरोदे यांनी व्यक्त केले. “कोणत्याही मोठ्या ठिकाणी हा कार्यक्रम केला असता तरी मला हे समाधान लाभले नसते,जे समाधान मला माझ्या गावाच्या मातीमध्ये माझ्या पहिल्या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मिळत आहे” असे मत कार्यक्रमात आपले मनोगत मांडताना कवयित्री पुनम सुलाने यांनी व्यक्त केले. “कवयित्री पूनम सुलाने जाफराबाद तालुक्याच्या खऱ्या बहिणाबाई असून, गावातील प्रत्येक स्त्रीने यांचा काव्यसंग्रह वाचून प्रेरणा घ्यावी” असे मत व्यक्त करत काव्यसंग्रहाची समीक्षा करताना कवी, लेखक सुधाकरसिंह चिंधोटे यांनी व्यक्त करून आलेल्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित सर्वांना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत पुस्तकाची ओळख करून दिली.” “गोकुळवाडी ते देशातील बाहेर राज्यात वास्तव्याला असून स्वतःचे हिंदी पुस्तक प्रकाशन असून देखील मराठी भाषेचा अभिमान बाळगत मराठी मध्ये साहित्यनिर्मिती करणाऱ्या पूनम सुलाने- सिंगल यांची कामगिरी खरोखरच खूप कौतुकास्पद आहे असे व्यक्तव्य जाफराबादचे साहित्यसंघ अध्यक्ष दत्तात्रय गवळी यांनी व्यक्त केले. “साहित्य क्षेत्रात आपले नावलौकीक मिळवणाऱ्या पूनमचे आम्हाला अभिमान आहे, असे मत सुखदेव अवकाळे यांनी व्यक्त केले”.
“कौटुंबिक जबाबदारी पार पाडून आपल्या कुटुंबासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत जेव्हा एक स्त्री पुढे जात असते तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची मिळालेली साथ प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देत असते”. असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखाताई लहाने यांनी व्यक्त केले. शेवटी आभार कार्यक्रमाला आलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानत. कवियत्री “पुनम सुलाने-सिंगल ही आमच्या गावाची मुलगी आणि सून आहे ह्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना खूप खूप अभिमान आहे” असे मत गावाचे जेष्ठ नागरिक विजयसिंग सिंगल यांनी व्यक्त केले.