DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- निवास गागडे
कोल्हापूर :- कंजारभाट समाजातील विविध सामाजिक कार्यक्रमाच्या सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी करण्यात आला. गुरुवार कंजारभाट नवीन वसाहत स्वर्गीय शिवाजी खवरे भाजी मार्केट समोरील महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या वरच्या मोकळ्या पॅकेजच्या ठिकाणी सांस्कृतिक हॉलचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. पायाभरणी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माजी पाणी पुरवठा सभापती श्रीरंग खवरे , माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे ,माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते , माजी नगरसेवक नरेश नगरकर ,रवी जावळे हे होते.
इचलकरंजी शहरांमध्ये गेली 40 ते 45 वर्षे कंजारभाट समाज हा एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने स्थायिक असून हातच्या पोटावर उपजीविका करणारा गोरगरीब समाज आहे. एवढा मोठा कंजारभाट समाज असल्यामुळे समाजात होणारे छोटे-मोठे शुभ कार्यक्रम होत असतात. इंदिरा नगर, शांती नगर, आणि गाळे धारकांच्या सोयीसाठी सामाजिक कला क्रीडा व संस्कृती व शालेय कार्यक्रम घेण्यासाठी व भागातील सर्व नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. या उद्देशाने ह.भ. प. विष्णुपंत नेतले व सामाजिक कार्य करणारे गोविंद टिळंगे यांनी गेली सात ते आठ वर्षे या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून गाळेधारकांची आणि भागातील नागरिकांची अडी अडचणी महापालिकेच्या निदर्शनास दाखवून दिले. शासनाच्या जी. आर. प्रमाणे कंजारभाट सामाजिक सांस्कृती हॉल मंजूर करून दिलेने संस्कृती हॉलचे काम कॉन्ट्र्ॅकटर संगीता शिवलिंगे व अनिल चव्हाण हे करून घेणार आहेत. तरी या कंजारभाट सामाजिक सांस्कृतीक हॉल च्या पायाभरणी सांमारंभास गाळेधारक व भागातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुरसिंग मिणेकर, नागेश कॅदगी, महेश नगरकर, बबलू गागडे, निवास गागडे, जयसिंग नेतले संजय गागडे, राजू टिळगें, गणेश माछरे, बबलू मिणेकर, मुन्ना भाट, राहुल नगरकर, मुकुंद गागडे, नंदू गागडे यांनी मानले.