DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- जयेश जाधव
कर्जत :- कर्जत तालुक्यातील जमीनीचे भाव आज पाहीले तर सर्व सामान्य माणसाला एखाद्या गुंठा घ्यायचा म्हटलं तरी दहा वेळा विचार करावा लागतो. गेले काही वर्षे कर्जत तालुक्यात जमीन खरेदी विक्री यांचे प्रमाण खुप जास्त वाढले असून व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत या होणाऱ्या व्यवहारातुन गावागावात व भावाभावांत हिस्सा वाटप किंवा आर्थिक दृष्ट्याही वाद सुरू होऊन भांडणे होत आहेत. त्यामध्ये नात्यांपेक्षा दुरावा निर्माण होऊन पैसा खूप महत्त्वाचा झाला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. अशाच व्यवहारांमुळे शाब्दिक वाद, लाठ्याकाठ्याने हाणामारी, चाकूने हल्ला असे अनेक वादविवाद वाढत आहेत. असाच काहीशा प्रकार आज दि.१० जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील तहसील कार्यालया बाहेरील गेट समोर मावस भावानेच भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर या मध्ये मावस भावानेच आईच्या समत्तीने मावस भावाच्या पाठीवर,खांद्यावर व हातावर चाकुने वार केल्याची माहिती समोर आली आहे. तर स्वतःची मावशी हिच स्वतःच्या मुलाला सांगत होती की, तु मार पुढे काय होईल ते पाहुया. ही घटना पहाता मावशी भाच्याच्या पैशाच्या हव्यासापोटी नात्यामध्ये दुरावा व काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. यामध्ये रणजित करताडे रा. सावरगांव यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.सदर गुन्ह्यातील विशाल शरद दाबणे,निता शरद दाभणे अशी आरोपीची नावे असून आरोपीत यांस अटक करण्यात आली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 183/ 2023 भा.दं.वि. क. 307, 341, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि / श्री. राजु रसेडे हे करीत आहेत.