DPT News Network मुंबई : हे झटपट कर्जाचे युग आहे. आज प्रत्येकाला त्वरित कर्जाची गरज आहे. दररोज आपल्याला पर्सनल लोन घेण्यासाठी अनेक बँकांकडून फोन केले जातात. तसेच ई-मेल किंवा एसएमएसही पाठवले जातात. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे उभारण्यासाठी पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे. हे कर्ज तात्काळ आणि सहजपणे मिळत असल्याने अनेक जण याला प्राधान्य देतात.
सध्या इंटरनेटवर असे अनेक लोन अॅप्स आहेत जे स्वस्त कर्ज देण्याचे आश्वासन देतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लोक कर्ज घेतात. यातील काही अॅप्स खरे आहेत तर काही खोटेही आहेत. गेल्या काही दिवसांत अशा खोट्या अॅप्स मार्फत अनेक लोकांना लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खरे कर्ज अॅप्स आणि बनावट अॅप्स नक्की कोणते हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
कोणत्या बँकेशी जोडलेले आहे?
सर्व प्रथम हे अॅप डाउनलोड करण्यापूर्वी ते कोणत्या बँकेशी संबंधित आहे ते तपासले पाहिजे. तसेच नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) कोणती आहे हेही माहिती करून घेतले पाहिजे. गगलच्या धोरणानुसार, कोणत्याही कर्ज अॅपशी संबंधित NBFC असणे आवश्यक आहे. जर अॅपशी कोणतीही बँक जोडलेली नसेल तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
अॅप कंपनी ट्रॅक रेकॉर्ड
अॅपवरून कर्ज घेण्यापूर्वी ते अॅप कोणती कंपनी चालवते, कोणत्या कंपनीने बनवले हे जाणून घेतले पाहिजे. यासोबतच कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही तपासावा. कंपनीची वेबसाइट, संपर्क तपशील, कार्यालयाचा पत्ता तपासणे आवश्यक आहे. त्याचे कार्यालय भारतात कुठे आहे याची माहिती घ्यायला हवी.
रेटिंग बघणे आवश्यक
कर्ज अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रेटिंग आणि व्हूयज वाचले पाहिजेत. यासंबंधीचे सर्व तपशील तुम्हाला अॅप स्टोअरवर मिळतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अँड्रॉइड यूजर्सवर चालणाऱ्या वेगवेगळ्या अॅप स्टोअर्सवर सुमारे 600 बेकायदेशीर कर्ज अॅप चालू आहेत.
वैयक्तिक डेटा चोरीचा धोका
बनावट अॅप वापरकर्त्यांकडून अनेक प्रकारची माहिती विचारतात. यामुळे वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोकाही वाढतो. चांगले अॅप जास्त माहिती विचारत नाही. कारण त्यांना फक्त आवश्यक माहिती हवी असते. जसे मोबाईल, बँक खाते, जन्मतारीख आणि नाव इ.