DPT NEWS NETWORK ✍️.
*प्रतिनिधी : रायप्पा मंडले*
गेली साडेतीन वर्ष कासार शिरसी येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवणाथ डमाळे यांची नुकतीच लातूर येथील पोलीस मुख्यालयात वाचकपदी बदली करण्यात आली त्यांच्या जागी औसा येथून नव्याने येथे रुजू झालेली नूतन एपीआय रियाज मुनीर शेख हे रुजू झाल्याने त्यांच्या स्वागतासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेवनाथ डमाळे यांना निरोप देण्यात आला
कासार सिरसी पोलीस ठाण्याचे मनमिळावू कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रेवनाथ डमाळे यांची बदली झाली त्या प्रित्यर्थ कासार शिरसी ग्रामपंचायत व्यापारी असोशियन व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला या निमित्य येथील भाजपा मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे व जिलानी बागवान धनराज होळकुंदे ओम बिरादार नाना धुमाळ नितीन पाटील बालाजी बिराजदार परमेश्वर बिराजदार गोरखनाथ होळकुदे संदीप बनसोडे राहुल ईश्वरे रायाप्पा मंडले विद्यमाने त्यांना निरोप देण्यात आला तर नूतन पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या समारंभात त्यांच्या काळात केलेल्या कार्यासह कोविड काळात बजावलेल्या कर्तव्याचा गौरव करण्यात आला
निरोप समारंभास उत्तर देताना भारावून गेलेले डमाळे म्हणाले की मला ग्रामीण भागात असलेल्या खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला मी आपले प्रेम कधीच विसरू शकणार नाही असे सांगून माझ्या काळात माझ्याकडून काही अन्याय झाला असल्यास क्षमा करा असे सांगितले
नूतन अधिकारी म्हणाले की मी आपणास डमाले साहेबांचा विसर पडू न देता कार्य करेन आपण जनतेने मला सहकार्य करावे.