DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: रायप्पा मंडले
लातूर: कासार शिरसी पोलीसांनी अचानक टाकलेल्या धाडीत तीन लाख 98 हजार 930 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली
.
वरील संदर्भी कासार शिरसी पोलिसांकडून मिळालेली हकीकत अशी की येथील कोराळी रोडवरच्या एवंन किराणा स्टोअर व स्वप्नील किराणा स्टोअर मधून बेकायदेशीर गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी मंगळवार तारीख 31 रोजी अचानक छापा मारून एवंन किराणा स्टोअर मधून एक लाख 82 हजार 170 रुपये किमतीचा तर स्वप्निल किराणा मधून एक लाख 16 हजार 760 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला या प्रकरणी प्रकाश शिवहर डोंमगावे राहणार कोराळी वय पन्नास वर्ष तर बाबू वाहेद अली तांबोळी राहणार कासार शिरशी यांना अटक केली या घटनेचा अधिक तपास येथील एपीआय रेवनाथ ढमाले हे करीत आहेत.