नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

क्रशर मालकांनी गिट्टीच्या किमतीत केली अचानक वाढ


   क्रशर मालकांच्या मनमानीने ग्राहक, ट्रक मालक अडचणीत

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी: अमर मोकाशी

नागपूर :- स्टोन क्रशर मालकांनी गिट्टी व तत्सम उत्पादनाच्या किमतीत प्रती चौरस फुटामागे दोन रुपयांपासून तर पाच रूपयांपर्यंत वाढ केली. ही दरवाढ गत 15 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आली आहे. अचानक करण्यात आलेल्या दरवाढीने ग्राहकांची प्रचंड लूट होऊ लागली असून क्रशर मालकांच्या मनमानीवर निर्बंध लावण्याची मागणी ग्राहक व ट्रक मालकांनी केली आहे.
   प्रती चौरस फूट 20 mm गिट्टीचे जुने दर 23 रुपये (प्रती टन 550) होते ते वाढवून आता 28 रुपये (प्रती टन 670) करण्यात आले. त्याचप्रमाणे 60/80 mm, 40 mm, व 10 mm चे जुने दर अनुक्रमे 21,22 व 17 (प्रती टन 487,505 व 395) रुपये होते, ते आता 25,26 व 22 (प्रती टन 580, 600 व 510) रुपये करण्यात आले आहे. डस्ट व जीसबी चे जुने दर 22 व 21 रु. चौ. फूट (प्रती टन 485 व 420) होते. त्यात वाढ करुन दोन्ही चे दर आता 25 (प्रती टन 550 व 500) रुपये करण्यात आले. व्हिएसआय चे 20 व 10mm चे जुने दर 27 आणी 22 (प्रती टन 650 व 485) रुपये होते नवे दर 30 व 24 (प्रती टन 720 व 530) रुपये प्रती चौ. फूट करण्यात आले. क्रशड सॅन्डचे आधीचे दर 25 (प्रती टन 530) रुपये होते, ते वाढवून 27 रु. चौ. फूट (प्रती टन 570) करण्यात आले.
   स्टोन क्रशर मालकांची संघटना असलेल्या ‘ऑरेंज सिटी क्रशर ओनर्स असोसिएशन नागपूर’ या संघटनेने एकमताने वरील दरवाढीचा निर्णय घेतला आणी तो गत 15 ऑक्टोबर पासून लागू सुद्धा केला. दर वाढवितांना ग्राहक व ट्रक मालकांचा कसलाही विचार संघटनेने केला नसल्याचा आरोप ट्रक मालकांकडून केला जात आहे. या दरवाढीचा फटका बांधकाम व्यवसायाला बसत आहे. मार्केट मध्ये वाळूच्या दरात आधीच प्रचंड वाढ झालेली आहे. ग्राहक मागेल ते दाम मोजायला तयार असूनही वाळू मिळत नाही. त्यातुन बांधकाम व्यवसायाला मंदीचा सामना करावा लागत आहे. अशात गिट्टीच्या किमती वाढविण्यात आल्याने बांधकाम क्षेत्राला दुहेरी मार सहन करावा लागत असून त्याची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे.

—-> क्रशर मालक व अधिकाऱ्यांचे साठेलोटे

      प्लॅन्ट वरून वाढीव किमतीत माल खरेदी करून तो ग्राहकांना पोहचवीने मोटार मालकांना अडचणीचे ठरू लागले आहे. वाढलेल्या दराने ग्राहक पैसे द्यायला तयार होत नाहीत. परवडत नसल्याने अनेक मोटार मालकांनी गिट्टी वाहतूक बंद करुन वाहने उभी केली आहेत. याचा फायदा क्रशर मालक उचलत आहेत. बहुतांश क्रशर मालकांकडे स्वतःचे ट्रक, टिप्पर आहेत. ते स्वतःच त्यांच्या प्लॅन्ट वरील माल ग्राहकांना पोहचवून रग्गड कमाई करीत आहेत. महसूल व खणन विभागातील अधिकाऱ्यांचे क्रशर मालकांशी साठेलोटे असल्याने ते त्यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष करतात. अनेक क्रशर प्लॅन्टच्या लीजची मुदत संपली असतांनाही  प्लॅन्ट मधून गिट्टी, चुरी, डस्ट, व क्रशड सॅन्डचे विना परवाना उत्पादन सुरूच आहे. अशा बेकायदेशीर प्लॅन्ट विरोधात कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

—-> दरवाढ मागे घेण्याची मागणी

     पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. शासनाने रॉयल्टी व इतर टॅक्सेस मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. असे असतांना अचानक गिट्टी व तत्सम उत्पाद्नांच्या किमती वाढविण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करुन क्रशर मालक संघटनेनी केलेली दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ग्राहक व ट्रक मालकांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:03 am, December 23, 2024
19°
साफ आकाश
Wind: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!