DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: दत्तात्रय माने
पिंपरी : देशात धनवान होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करत असतात असेच क्रिप्टो करेंसी बद्दल देखील लोकांना मोठे ॲट्रॅक्शन झाल्यामुळे क्रिप्टो करन्सी देखील लोक गुंतवणूक करत आहेत असाच गुंतवणुक करत असताना पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेची 27 लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित क्रमांकावरून व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवरून अर्पिता नावाने बोलणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना
१८ ते २९ मार्च या कालावधीत बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली. अनोळखी महिलेने फिर्यादीस व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या सोशल मीडियावर मेसेज करून क्रिप्टो करन्सीमध्ये शॉर्ट प्रीपेड प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांचा ट्रेड चुकल्याचे सांगून दंड, इनकम टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून २७ लाख ५०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.