DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे :- खुनाचा प्रयत्न करून १० वर्ष फरार झालेल्या आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत, राजन सहानी असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे या बाबत संपूर्ण माहिती अशी कि, दि.२३/१०/२०१४ रोजी आरोपीने फिर्यादी याचे मालकाचे भावास शिवीगाळ केली होती त्या नंतर फिर्यादी व त्याचे मालक त्यांचा भाऊ असे आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी राजन व इतर ४ लोकांनी काठी, दांडक्याच्या साह्याने फिर्यादी त्याचे मालक व मालकाचा भाऊ यांना जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केली होती, तेंव्हा एकच्या डोक्यात काठी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्या नंतर काही लोकांनी भांडणे सोडवली तेंव्हा फिर्यादीने जखमीस उपचार कामी बिर्ला हॉस्पिटल येथे दाखल केले होते त्या नंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून वाकड पोलिसात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेंव्हा पासून जाव्पास १० वर्ष आरोपी फरार झाला होता. त्या नंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये वाकड पोलिसांनी राजन यास अटक केली होती, त्या नंतर आरोपी राजन ची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना आरोपी राजन याने ऍड. नितीन भालेराव यांच्या मार्फत म. जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीने कुठलाही गुन्हा केला नसून या उलट फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी आरोपीस त्याचे घरी जाऊन मारहाण केलेली आहे, तसेच त्या बाबत आरोपी याचे भावाचे फिर्यादी वरून सन २०१४ मध्ये फिर्यादी यांचे वर वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला सरकारपक्षाचा व आरोपींचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश श्री.ए.एन. मरे साहेबांनी आरोपीला अटी व शर्थींवर जामीन देण्याचे आदेश पारित केले आहेत अशी माहिती आरोपीचे वकील अॕड. नितीन भालेराव सदर कामी अॕड. मयूर चौधरी, अॕड. स्वप्नील दाभाडे यांनी मदत केली.