राष्ट्रवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
⭐⭐⭐दर्शन पोलीस टाइम⭐⭐⭐
धुळे:- गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या हिंदू-मुस्लीम सणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची श्री रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
दिनांक 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आहे. हे दोघे सण हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. हजारो, लाखोंच्या संख्येने नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. परंतु सण, उत्सव जवळ असताना शहरातील सर्व रस्ते खराब आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना पायी चालणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. शहरात घाणच घाण दिसून येते. तसेच शहरातील बहुतांश भागांमध्ये पथदिवे बंद आहे. रात्रीच्या वेळेस फिरताना सर्वत्र काळोख दिसून येतो. महिला रात्री बाहेर पडू शकत नाही. त्याचप्रमाणे भर पावसाळ्यात आठ ते दहा दिवसानंतर पिण्याचे पाणी येते. शहरात मोकाट जनावरे,मोकाट कुत्र्यांचा सुसाट वाढला आहे.सणासुदीच्या दिवसांमध्ये हे अतिशय चुकीचे आहे. धुळे महानगरपालिकेची जबाबदारी आहे की ,वेळेवर नागरिकांना सुख सुविधा द्यायला पाहिजे. परंतु धुळे महानगरपालिका लोकांना सुविधा देऊ शकत नाही.
तरी लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे,खड्डे बुजवण्यात यावी, बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावे, पाणीपुरवठा वेळेवर करण्यात यावा, शहरातील कचरा उचलून लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ करून खड्डे बुजवण्यात यावे. अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली. नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करतील. असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते रणजीत राजे भोसले, जितू पाटील, अमित शेख, मनीष महाजन, बंटी वाघ, सुरेश जवराळ, सजन बागुल, भिका नेरकर, डॉल्बीक मलबारी, नंदू यलमामे, शकीला बक्ष, डी.टी पाटील, अविष्कार मोरे, नूर शहा, दीपक देवरे, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, युनूस शेख, निखिल मोमाया, सोनू घारू, अण्णा सूर्यवंशी, अशोक गवळे, तरुणा पाटील, राजेंद्र सोलंकी, भुषण पाटील, शामराव उखमरे, रवी पवार, राजेंद्र डोमाळे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, युसुफ शेख, अनिस शेख, मनोहर निकम, अशोक धुलकर,जीवन चव्हाण, वाल्मीक मराठे, वसीम मंत्री सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.