एका खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना केली अटक…
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नंदकिशोर मेश्राम चंद्रपूर : – दि. 18 जून रोजी पोलीस स्टेशन पडोली येथे 187 / 23 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा नोंद झाला असून छोटा नागपुर रोड येथील पाइप लाइन जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडुन आहे व त्या मुलावर राखळ टाकुन आहे. अशी माहीती मिळाली, घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार तात्काळ पोहचले, गुन्ह्याचा छडा लवकर व्हावा यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वात पथक गठीत करीत तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक हे घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरूवात केली व गोपनीय माहिती काढुन अनोळखी मयत इसमाची ओळख पटविली असता मयत इसम हा नेहरू कॉलेज जवळ घुटकाळा वार्ड चंद्रपुर येथील असल्याचे निष्पन्न झाले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करून दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता गोपनिय माहिती की, मृतक व दोन आरोपी हे शुक्रवारी रात्री अंदाजे 08:00 ते 8.30 चे दरम्यान पडोली येथे मोटारसायकलने गेले होते सदर ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होवुन भांडण झाल्याने सदर भांडणामधुनच एकमेकांवर वार केले व तिथे पडुन असलेल्या लोखंडी वस्तूने मृतकाच्या डोक्यावर मारून खुन कला व मृतकाच्या बॉडीवर जवळ पडलेली राख टाकुन निघुन गेले अशी कबुली दिली.
आरोपी व मृतक ह्यांचे एकाच मुलीवर प्रेम होते, आरोपी व मृतक हा सुद्धा त्यांच्या प्रेयसीवर प्रेम करीत असल्याची माहिती मिळाली, त्यांचा राग अनावर झाला, आपण आधी मृतकाला समजावून त्याला प्रेयसीपासून दूर करू अशी योजना आरोपीने आखली.
शुक्रवारी आरोपी व मृतक हे तिघेजण एकमेकांना भेटले आरोपीनी मृतकाला प्रेयसीपासून दूर रहा असे समजविले मात्र त्यामध्ये तिघांचा वाद सुरू झाला. मृतक ऐकत नसल्याने आरोपीनी मृतकाच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
आपलं बिंग फुटू नये यासाठी आरोपीनी मृतदेहावर राख टाकत तिथून निघून गेले. मात्र 2 दिवसांनी त्याच बिंग फुटलं.
खुनासारखा गंभीर गुन्हयातील मृतक हा अनोळखी असतांना सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत संवेदनशील व गुंतागुतीच्या गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या आठ तासात मृतकाची ओळख पटवुन आरोपीचा शोध लावुन त्याना जेरबंद करून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन पडोली यांचे ताब्यात देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल 4 खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहे.
सदर कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंदपुर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पो.उप.नि. विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, पो.ना. संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पो.शि. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले यांनी केली.