धुळे – वडगावशेरी मतदार संघातील विश्रांतवाडी, टिंगरे नगर, लोहगाव, धानोरी परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनिय काम करणार्या महिलांचा जन ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापुरुषांच्या प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रमा जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, कार्याध्यक्ष युवराज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विशाल घोक्षे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माने, सह्याद्री सम्राट स्वाभिमान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांदवे पाटील उपस्थित होते.
तसेच धुळे येथील कार्यक्रमात महिला तहसीलदार सौ. गायत्री सौंदाणे यांचा पुष्पगुच्छ देऊन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार केला व धुळे शहर वाहतुक शाखेतील महिला पो.कॉ. दीपिका वाघमोरे, राणी दामोदर व मनीषा गायकवाड यांचा देखील फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार करते समयी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन व ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, कार्याध्यक्ष युवराज देवरे व धुळे जिल्हा संघटक संदीप अहिरे उपस्थित होते.