DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अकोला:- जिल्हा परिषद विद्यालय, माना येथे 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हा परिषद विद्यालय, मानाचे मुख्याध्यापक गजानन गिरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण समारंभासाठी पंचायत समिती सदस्य रविंद्र भाऊ घुरडे, माना ग्रामपंचायतचे सरपंच जमील भाई कुरेशी, उपसरपंच गजानन भाऊ गायकवाड, माजी सरपंच राजाभाऊ देशमुख, सतीश भाऊ मोखडकर, रत्नदीप डोंगरे, अविनाश चक्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत अजाबरावजी गुडदे, अस्मिता ताई इंगळे, मनोज गायकवाड विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, खंडेराव पांडे, सतीश गोकणे, उत्तम चव्हाण, लाला तवाडे, पुरुषोत्तम कदम, रजनी कांडलकर, सारिका पिंजरकर, अणुशक्ती वानखेडे, शिल्पा तेलखेडे, भुवनेश्वरी सुसतकर शिल्पा पाठक, सतीश सोळंके माना येथील सर्व आजी-माजी सैनिक, विनोद देशमुख, प्रशांत सावजी, संजय भेंडकर आणि वर्ग पाच ते दहा चे विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणा नंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्य दिन चिरायू हो हे नारे लावण्यात आले आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. स्वातंत्र्य दिन समारंभाचे संचालन वर्ग सातवीची विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी खांडेकरने इंग्रजी मधून केले तर आभार प्रदर्शन खंडेराव पांडे यांनी केले.