DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे
सांगली :- पेठ नाका ( ता. वाळवा ) येथील बस थांब्याजवळ डंम्परणे दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वकील सौ. वैशाली प्रशांत कांबळे – देशमुख वय 40 वर्षे मूळ गांव नेर्ले ( माहेरकडील ) सध्या रा. इस्लामपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर तेजस्विनी आनंदराव देसाई वय 27 रा. शिरटे ता. वाळवा, या गंभीर जखमी झाल्या. सदरचा अपघात सोमवार दिनांक 4/11/24 रोजी दुपारी घडला. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आला.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, सोमवारी दुपारी वैशाली व तेजस्विनी या दुचाकीवरून ( एम. एच.09 ई. ई. 5738 ) काळामवाडीवरून येथे गेल्या होत्या. दोघी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरकडे निघाल्या होत्या. पेठनाक्याजवळ बसला ओलांडून पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला डंम्परणे ( एम. एच.10 डिटी 4087 ) धडक दिली. वैशाली या डम्पराच्या चाका खाली सापडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या तेजस्विनी देसाई गंभीर जखमी झाल्या. सदरच्या अपघाताची माहिती मिळताच वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तेजस्वीनी यांच्यावर इस्लापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशिरा पोलिसांनी तेजस्विनी यांचा जबाब नोंदविला.