DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️
विटा शहर प्रतिनिधी – संतोष भंडारे
विटा- नवरात्रोत्सवाचे अनुशंगाने आपापले पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यांवर व बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबतचे आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास हद्दीमध्ये पेट्रोलिंग केली करत असताना.
पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक व पोउपनि / सचिन शेंडकर असे विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोहेकों उत्तम माळी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम मोटारसायकलवर तलवार घेवुन फिरत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार पचासह दगडी पाण्याची टाकी येथे जावुन वॉच केला असता विनोद कैफेकडे जाणारे रोडवर पल्सर मोटारसायकलवर दोन संशयित इसम उभे असल्याचे दिसले त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना शिताफिने त्यांना ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक दोन्ही बाजुस धारधार असलेली लोखंडी तलवार मिळून आली. सदरची तलवार बाळगणेबाबत याचेकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यानी सांगीतले. त्यावेळी पोहेकॉ/१७४१ माळी यांनी सदरची तलवार पुढील तपासकामी पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करुन सदर इसमाविरुध्द विटा पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.