DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- शुभम पाटील
पालघर :- पालघर तालुक्यातील जागतिक स्तरावर नावाजलेले गाव असलेल्या तारापूर गावच्या डम्पिंग ग्राउंड वर अनधिकृत रासायनिक कचरा टाकणारा, टेम्पो (टेम्पो क्र. MH 48 BM 3286) (टेम्पो मालक – जगन्नाथ दामोदर संखे )जळून खाक झाला असून, टेम्पो चालकास विचारले असता, रासायनिक कचरा या डम्पिंग वर टाकण्यासाठी टेम्पो चालका कडून हप्ता घेण्यात येत होता…? असे समजले आहे.
महसूल विभागाच्या असलेल्या या जागेत, तारापूर गावाचा कचरा टाकण्यात येत होता. याच जागेत नैसर्गिक तिवाराची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. याच ठिकाणी तारापूर औद्योगिक वसाहतीतील निघणारा रासायनिक कचरा चोरी छुप्या पद्धतीने टाकण्यात येत आहे. असा आरोप परिसरातील ग्रामस्थांन कडून करण्यात येत आहे….? या जागेमध्ये असलेल्या नैसर्गिक तिवरीच्या झाडांवर त्याचा परिणाम होऊन, तिवरी नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे.
जळालेल्या टेम्पो चालक एका विडिओ मध्ये या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पाच हजार रुपये महिना देत असल्याचा म्हंटले आहे. औद्योगिक वसाहती मधिल कारखान्यातून निघणारा रासायनिक कचरा इतरत्र कुठेही फेकता येत नसून, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ही पद्धत नाही. आर्थिक देवाण घेवाण करून, गावचा परिसर घाण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांन मध्ये बोलले जात आहे.
याबाबत तक्रार झाल्यावर वन परिशेत्र अधिकारी (तिवरी संवर्धन ) दिलीप साळुंखे यांनी भेट देऊन आपले निरीक्षण नोंदवले आहे. लवकरच या रासायनिक कचऱ्या बाबत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
पाच हजार रुपये महिना हप्ता घेणारा सुनिकेत कोण…? त्याला डम्पिंग वर रासायनिक कचरा टाकण्याचा अधिकार कोणी दिला…? तसेच कचरा टाकण्या साठी पाच हजार हप्ता देणारी वंजारी मॅडम मोना संखे कोण..? या प्रश्नाचे उत्तर तारापूर परिसरातील ग्रामस्थांना मिळणे गरजेचे बनले आहे.
प्रतिक्रिया /-
आमच्या ग्रामपंचायत हद्दीत रात्री चोरी छुप्या पद्धतीने एम आई डी सी तील रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्या बाबत आम्ही कारवाई साठी एम पी सी बी आणि तारापूर पोलीस ठाणे यांना पत्र दिले आहे.
–चेतन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, तारापूर ग्रामपंचायत.
प्रतिक्रिया /-
आम्ही तारापूर येथिल तिवरीच्या क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली असून, रासायनिक कचऱ्याची चोरी छुप्या पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या विरोधात सक्त कारवाई करणार आहोत.
दिलीप साळुंखे, परिक्षेत्र वन अधिकारी (तिवरी संवर्धन )