DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
तुमसर :- अंगणातील दुचाकी चोरीला गेल्याची घटना तुमसर शहरात घडली. शहरातील संजय सूर्यभान रहांगडाले यांनी आपल्या मालकीची दुचाकी रात्रीच्या दरम्यान घराच्या अंगणासामोरील खुल्या जागेत पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती मोटरसायकल चोरून नेली ही घटना दिनांक 11/ 12 /2024 च्या मध्यरात्री घडली दुचाकी मालकाचे 30 हजार रुपये चे नुकसान झाले असून, तुमसर पोलीस ठाणे मध्ये तक्रार नोंदविली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३/२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तपास पोलीस हवालदार समित रहांगडाले करीत आहे. तुमसर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ दिसून येत असून पोलीस ठाणेला आपली गस्त वाढवण्याची गरज असल्याचे चित्र दिसून येत आहे.