DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- शेतात चरत असलेल्या गायीवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी तालुक्यातील खातखेडा शिवारात घडली.
अमोल वसंता थेरे रा. खातखेडा असे गाय मालकाचे नाव आहे. या घटनेत त्यांचे 80 हजाराचे नुकसान झाले. थेरे यांच्या गायी सोबतच अन्य जनावरे शेतात चरत होती. दुपारी तीनच्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक थेरे यांच्या जर्सी गायीवर हल्ला चढवून तीच्या नरडीचा घोट घेतला. हल्ला होताच इतर जनावरे जिवाच्या एकांताने सैरावैरा पळत सुटली. घटनेची सुचणा मिळताच वन विभागाच्या दक्षिण परीक्षेत्राचे राउंड ऑफिसर येढे व वनरक्षक भलावी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पायाच्या ठस्यांचे निरीक्षण करुन हा हल्ला वाघाने केल्याचे त्यांनी सांगितले.