नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दि इचलकरंजी बार असोसिएशन 2024 ते 2026 निवडणूक पार पडली

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- निवास गागडे
                  

इचलकरंजी:- दि इचलकरंजी बार असोसिएशनची सध्या झालेली निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. या प्रक्रियेत  459 पैकी436 सभासदांनी आपले हक्काचे मतदान केले. त्यामध्ये 9 जागांसाठी दोन पॅनलचे 18 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सत्तारूढ गटाचे सहा तर विरोध गटाचे तीन अशा पद्धतीने नऊ उमेदवार निवडून आल्यानंतर आनंद व्यक्त करून विजयाचा गुलाल उधळून जल्लोष केला.


इचलकरंजी बार असोसिएशनच्या द्वितीय निवडणुकीत विरोधी गटाचे एडवोकेट आर आर तोष्णीवाल यांनी 233 मताने बाजी मारून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.तसेच एडवोकेट राजाराम सुतार यांनी 240 मतांनी बाजी मारुन त्यांची  उपाध्यक्ष पदी निवड झाली सचिव पदी एडवोकेट अभिजीत माने 222 मतांनी सहसचिव पदी एडवोकेट आदित्य मुदगल 235 मतांनी खजिनदार पदासाठी एडवोकेट विजय शिंगारे 221 मतांनी महिला प्रतिनिधी पदासाठी एडवोकेट दिपाली हणबर 247 मतांनी त्याचबरोबर तीन कार्यकारीणी पदासाठी एडवोकेट महेश कांबळे 223 मतांनी एडवोकेट राहुल काटकर 215 मतांनी तसेच एडवोकेट शैलेंद्र वीरसिंग रजपूत 224 मतांनी विजयी झाले या निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एडवोकेट जी जे सावंत तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एडवोकेट राजीव शिंगे व एडवोकेट नीता परीट यांनी काम पाहिले तर प्रवीण फगरे आणि विष्णू उरणे यांनी सुंदर रित्या सहकार्य केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:25 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!