नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देशी कट्टा घेऊन वहिणीसमोर करत होता थट्टा, चुकून गोळी सुटली आणि…

DPT News Network शिर्डी : देशी कट्टा घेऊन वहिणीसमोर शायनिंग करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. कट्ट्यातून चुकून गोळी सुटली आणि समोर उभ्या असलेल्या वहिणीचा नाहक जीव गेला. शिर्डीतल्या कोपरगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता भालेराव असं मृत महिलेचं नाव आहे.

कोपरगावमधल्या पोहेगाव इथं दुपारी 11 च्या सुमारास ही घटना घडली. विशाल भालेराव याने विनापरवाना गावठी कट्टा आणला होता. घरात त्याने वहिणीला देशा कट्टा दाखवला आणि तिच्यासमोर शायनिंग मारु लागला. पण ही मस्करी त्याला भलतीच महागात पडली. कट्टा दाखवण्याच्या नादात विशालकडून कट्टयाचा खटका ओडला गेला.

कट्ट्यातून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या सुनीता भालेराव यांच्या डोक्यातून थेट आरपार गेली. सुनीता जागेवरच रक्तबंबाळ होऊन पडल्या. समोर दृश्य पाहून विशाल घाबरला आणि तिथून तो फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी जखमी सुनीताला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधासाठी पथकं रावाना केली. पोलिसांनी एका तासात आरोपी विशालला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून विशालला हा देशी कट्टा कुठून आणला, त्याने कोणाकडून हा विकत घेतला का? याचा शोधही पोलीस घेत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:26 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!