नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देशी बवावटीचे अवैध्य पिस्टल बाळगणा-या इसमांना अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रवी पवार


खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी या गावी गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपासपथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बाळासो ज्ञानदेव पवार वय 34व राजेंद्र रामचंद्र मोहिते वय 39 दोन्ही रा.जोंधळखिंडी ता. खानापुर, जि. सांगली हे अवैध्यरित्या स्वतचे ताब्यात अग्निशस्त्र बाळगुन थांबले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपासपथकातील अंमलदार है जोंधळखिंडी फाटयाहून जोंधळखिंडी गांवात जाणारे रोडने खाजगी व सरकारी वाहणे उभी करुन पायी चालत जावुन बातमीचे अनुशंगाने जोंधळखिंडी गावचे हद्दीत गुरवकी नावाचे शिवारात पितांबर दादासो गुरव यांचे जनावराचे शेडजवळ २ संशयीत इसम मोटारसायकलवर थांबलेले दिसले ते पोलीस पथकास पाहून पळून जात असताना पोलीस पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्यापैकी बाळासो पवार याचे कमरेस एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) व पॅण्टचे उजये खिशात एक मैगजीन, त्यामध्ये ३ जिवंत काडतूसे मिळून आली.सदरचे देशी बनावटीची पिस्टल व ३ जिवंत राऊंड (गोळी) बाळगणे बाबत त्याचेकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगीतले. त्यावेळी पोलीस हवालदार उत्तम माळी यांनी त्यास सदरचे पिस्टल हे कोठून व कोणाकडुन आणले याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, सदरचे पिस्टल हे अक्षय उत्तम मोहिते, रा.जोंधळखिंडी, ता. खानापूर, जि. सांगली यांचे असून तो आमचा जवळचा नातेवाईक आहे. त्यांचे सांगण्यावरुन त्यांचे घरातील कपाटातून पिस्तुल आणून त्याला देण्यासाठी त्याच्या येण्याची वाट बघत इथे थांबलो आहे.सदरचे देशी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतुस व मोटरसायकल हे पुढील तपासकामी पोलीस हवालदार
उत्तम माळी ब.नं. १७४१ यांनी पंचासमक्ष जप्त करुन सदर इसमाविरुध्द विटा पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/सचिन शेंडकर हे करीत आहेत..मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे सोो, यांनी विधानसभा निवडणुक २०२४ आदर्श आचारसंहिताचे अनुशंगाने आपापले पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यांवर व बेकायदा बिगर परवाना शस्व बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबतचे आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने उपविभागीय पोलीस
अधिकारी विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
4:46 am, December 23, 2024
19°
कुछ बादल
Wind: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!