प्रतिनिधी :- दत्तात्रय माने
अहमद नगर : कोपरगाव शहरातील एका पुरूषाच्या अंगावर उकळते तेल टाकून काही तरी धारदार शास्त्राने गळ्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निलोफर रियाज शेख व अल्फीया रियाज शेख (दोघी रा.लक्ष्मीनगर ता.कोपरगाव) या दोघींच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अकबर हमीद शेख (वय-३२)रा.आश्वी खु.ता.संगमनेर याने गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अकबर हमीद शेख व आरोपी महिला निलोफर शेख व अल्फीया शेख यांचे काही कारणावरून वाद निर्माण झाला आहे. दि. २० ऑगष्ट रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे फिर्यादी आला असता आरोपी महिला निलोफर शेख व अल्फीया शेख यांनी संगनमत करून फिर्यादिस जीवे मारण्याचा उद्देशाने त्याच्या अंगावर उकळते तेल टाकून काहीतरी धारदार शस्त्राने गळ्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी करुनि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपी निलोफर रियाज शेख व अल्फीया रियाज शेख दोघी रा. लक्ष्मीनगर ता. कोपरगाव या दोघींच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अकबर हमीद शेख (वय-३२) रा. आश्वी खु. ता. संगमनेर याने गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव शहर पोलीस या प्रकरआजणी गुन्हा क्रं. २५३/२०२२ भा.द.वि. कलम ३०७, ३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.