DPT NEWS NETWORK 🗞️✍️
⭐⭐ दर्शन पोलीस टाइम ⭐⭐
धुळे:- धुळे जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जुलै २०२४ चे वेतन प्राप्त झाले असून व्हाउचर एंन्ट्री न केल्याने माहे ऑगस्ट २०२४ ची वेतन बिले फॉरवर्ड करता येणार नाहीत.करिता सदर वेतन श्री गणेश चतुर्थी पुर्वी अदा होणेसाठी नवीन वेतन पथक अधिक्षक नेमणूक करणे गरजेचे आहे.
आपल्या जिल्हयात प्राप्त माहितीनुसार २३०० ब्रोकन आय. डी. प्रलंबित आहेत. ज्या सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगाचा ३/४/५ वा हप्ता मिळालेला नाही. त्यासाठी आपल्या जिल्हयाला निधी प्राप्त झालेला असून सदर निधी परत जावु नये यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत योग्य ती कार्यवाही करावी.
पदवीधर आमदार व शिक्षक आमदार यांच्या तक्रार निवारण सभेतील आलेल्या शिक्षकांच्या प्रश्नांवर आपण त्वरीत कार्यवाही करावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारी दुय्यम सेवापुस्तक
वैयक्तिक मान्यताप्रत यासह इतर महत्वाचे दस्तावेज शालेय स्तरावरून त्यांना प्राप्त करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश पारित व्हावेत .
अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री.मनिष पवार साहेब यांनी नवीन वेतन पथक अधिक्षक नेमणूक साठी मा.उपसंचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला असून लवकरच नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.
निवेदन देताना अशपाक खाटीक राज्य संघटक सचिव, नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे,जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटोल, सचिव नानाभाऊ महाले, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, धुळे ग्रामीण सचिव किरण मासुळे, लाजरस गावीत, दामोदर पाटील,संजीव पावरा ,जयवंत पाटील,जगदीश बोरसे, मुश्ताक शेख आदी उपस्थित होते.