नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे तालुका पोलीसांची दमदार कारवाई, 22 लाख रुपयांच्या गुटख्यासह 51 लाखाचा माल हस्तगत

प्रतिबंधीत पानमसाला व गुटखा मालाची तस्करी रोखली

DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️दर्शन पोलीस टाईम

धुळे :- धुळे तालुका पोलिसांची दमदार कारवाई धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे  पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवायांचा धडाकाच लावला आहे. कारवाईंच्या बाबतीत धुळे जिल्ह्यात त्यांच्या कामाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

पकडलेल्या मालाचे पाहणी करताना अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील


सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभुमीवर मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांनी संपुर्ण धुळे जिल्हयातील पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना नाकाबंदी करुन जिल्हयातील सराईत गुन्हेगार तपासणी, पाहिजे असलेले आरोपी शोध मोहीम, नाकाबंदी करुन वाहने तपासणी, हिस्ट्रीशिटर तपासणी, अवैध दारु, गुटखा, अंमली पदार्थ तस्करी रोखण्याची प्रामुख्याने जबाबदारी दिली होती.
त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक, धुळे  श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी  संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोनि अभिषेक पाटील, यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांसोबत वाहन तपासणीचे नाकाबंदीचे आयोजन केले त्यात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक-03 वरुन इंदौर येथून आयसर ट्रक क्रमांक-CG-04-PN-4318 हिचेत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला माल भरुन मुंबई कडे घेवून जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बातमीतीची गांभीर्य लक्षांत घेवून अधिनस्त असलेले पोउनि विजय पाटील, पोहवा- कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोका-विशाल पाटील, पोकॉ-धिरज सांगळे, चालक अशांनी आज दिनांक- 28/10/2024 रोजी मुंबई आग्रा रोडवर आर्वी दुरक्षेत्रसमोर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू केली त्यात मिळालेल्या बातमीप्रमाणे एक तपकिरी रंगाची आयसर ट्रक क्रमांक- CG-04-PN-4318 धुळे कडून मालेगांव कडेस येतांना दिसली तसेच मिळालेल्या बातमीतील वाहनाची देखील खात्री झाल्याने आलेल्या ट्रकला थाबवुन तिची तपासणी केली असता त्यामध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणा-या गरम मसाल्याच्या गोण्यांच्या आड महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाकुचा माल मिळून आला त्यात 2170350/-रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाकुचा माल [गुटखा] असा एकुण-5170350/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी नामे फय्याजखान रज्जाकखान वय-30 व्यवसाय-ड्रायव्हर रा. खातेगांव ता. कनोद जि.देवास [मध्यप्रदेश) यांस ताब्यात घेतले आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:21 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!