DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नांदगाव पंचायत समिती कार्यालयात आठ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक
नाशिक:- नांदगाव पंचायत समिती येथील सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयातील टेबलची चांगली तपासणी अहवाल करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहेत.
नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहायक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले (वय 46 वर्षे) रा .महाजन वाडा ,मुक्ताई नगर, मालेगांव रोड, नांदगाव हे तक्रारदार यांच्या कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी येणार होते. कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी ‘तीन हजार रुपये द्या.’ अशी मागणी केली तसेच यातील तक्रार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून ‘त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या.’
मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार लाच स्वीकारून तक्रारदार यांची दप्तर तपासणीचे तीन हजार रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याची पाच हजार रुपये असे मिळून एकूण आठ हजार रुपये घेतांना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी साडेचारचे सुमारास रंगेहाथ मिळून आले. म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील पो.हवा. सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे नाशिक युनिट यांनी कारवाई केले.