DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
साक्री :- आगामी मकर संक्रांतीचे दिवसांत पंतग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणा-यांवर दिनांक १३/१२/२०२४ रोजी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत दुकानदार नामे हितेश शशिकांत शहा यांचे मेन रोड निजामपुर येथील व नामे किरण पंढरीनाथ चौधरी यांचे पाताळनगरी येथील दुकानात तपासणी केले असता पंतग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आल्याने पोकॉ/५०८ कृष्णा अशोक भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन- ३४३/२०२४ पर्यावरण कायदा १९८६ चे कलम ५,१५ सह भा.न्या.सं.का.-२०२३ चे क. २२३ प्रमाणे गुन्हा दाखल तसेच पोकॉ/४५९ टिलु नायका पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-३४४/२०२४ पर्यावरण कायदा १९८६ चे कलम ५,१५ सह भा.न्या.सं.का.- २०२३ चे क. २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यातील आरोपी अनुक्रमे १) नामे किरण पंढरीनाथ चौधरी वय-४० वर्षे रा. पातळनगरी निजामपुर ता. साक्री २) नामे हितेश शशिकांत शहा वय-४९ रा. मेन रोड निजामपुर ता. साक्री त्यांचे दुकानतुन एकुण-३५६०/- रुपयेचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मयुर एस. भामरे यांनी निजामपुर/जैताणे तसेच माळमाथा परिसरातील सर्व पतंग विक्रेते व दुकानदार यांना आव्हाहन केले आहे की, आपले दुकानात शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करता ठेऊ नये त्यामुळे अनेक व्यक्तींना आपला जिव गमवावा लागतो तरी आपण नियमांचे पालन करावे.
सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे. मा. किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/मयुर एस. भामरे, पोउपनी/प्रदीप पंडीत सोनवणे, पोहेकॉ/१२५४ नारायण माळचे, पोहेकॉ/४१० आर.यू.मोरे, पोहेकॉ/१३६१ प्रदीपकुमार आखाडे, पोकॉ/४५९ टिलु नायका, पोकॉ/५०८ कृष्णा अशोक भिल, पोकॉ/१२५३ पृथ्वीराज शिंदे, पोकों/२८४ सुनिल अहिरे, यांचे पथकाने केली आहे.