DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी- संजय जाधव
निफाड:- गोदा-नंदीनी रायडर्स व आदित्य स्पोर्टस्,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने म.गांधी जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रपिता म.गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जन्मदिवस सायकल राईड चे आयोजन केले होते.
निफाड सायकलीस्टच्या सदस्यांनी सहभाग घेऊन निफाड ते लाखलगाव व परत असा पन्नास किमी पेक्षा जास्त सायकलिंग पुर्ण केले.
नासिक ते कोटमगाव राईड ची पूर्व तयारी या वेळी करण्यात आली, धुक्यात हरवलेल्या रस्त्यातून सायकल चालवणे म्हणजे स्वर्ग सुखाची अनुभूती या वेळी आली.
आदित्य स्पोर्ट्स आणि गोदा – नंदिनी ग्रुप ने सुंदर नियोजन केले होते, सर्व रायडर्स ला या वेळी मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी राईडमध्ये प्रविण तनपुरे, अशोक कोल्हे, राजेंद्र गवळे, दिपक बोरसे, विक्रम डेर्ले, संदीप गवळी, संदीप काजळे, दिपक घंगाळे, ओमकार घंगाळे, अमोल जाधव यांनी सहभाग नोंदवला. राईड दरम्यान स्वच्छ भारत स्वच्छ परिसर, पाणी अडवा पाणी जिरवा, मुलगी शिकली प्रगती झाली, अवयव दान श्रेष्ठ दान, सायकल चालवा पर्यावरण वाचवा ई संदेश या प्रसंगी देण्यात आले.