DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी:- संजय जाधव
निफाड:- निफाड सायकलीस्ट आयोजित श्रावण सोमवार व शनिवार एकवीस किमी सायकलिंग पुर्ण करणाऱ्या सायकलीस्टचां निफाड मधील ताथेड हॉस्पीटल येथील हॉल मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. डेर्ले होते. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ सायकलीस्ट डॉ राहुल ताथेड, पत्रकार राजेंद्र जी थोरात यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, या प्रसंगी डॉ ताथेड यांनी सायकलिंग करतांना घ्यावयाची काळजी व आहार तसेच सायकलिंग केल्यामुळे आरोग्य कसे सुदृढ निरोगी राहते याचे मार्गदर्शन केले असून. सायकलीस्ट च्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण केले. अध्यक्ष डॉ डेर्ले यांनी नुकतीच केनिया व टांझानिया देशातील वन्य प्राणी यांचा अभ्यास पुर्ण अनुभवाचे कथन केले. असून तेथील प्राणी मात्र कश्या प्रकारे जीवन जगतात त्या बद्दल माहिती दिली . स्वागत व प्रास्ताविक प्रविण तनपुरे यांनी केले तर आभार डॉ सीमा डेर्ले यांनी मानले. मालेगांव सायकलीस्ट आयोजित श्रावण राईड सहाशे किमी पुर्ण करणारे व आदित्य स्पोर्ट्स आयोजित रन फॉर नेशन स्पर्धेचे मेडल वितरण करण्यात आले. याप्रसंगी सायकलीस्ट अशोक कोल्हे, पांडुरंग कडवे, अमोल जाधव, दिपक घंगाळे, ओंकार घंगाळे, दिपक बोरसे, संदीप गवळी, निलेश गवळी, सागर गवळी, वैभव आहेर, रविद्र निकम, संतोष काजळे, विशाल गवळी, सौ पुजा मगर, सौ ज्योती चोरडिया, डॉ सविता ताथेड, प्रियंका मोरे आदी उपस्थित होते.