कोल्हापूर:- न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन दिल्ली मुख्यालय हुपरी जि.कोल्हापूर ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वसामान्य, गरीब, शोषित,वंचित, पीढीत लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ नागेंद्र जाधव यांनी दि.२७ रोजी झालेल्या हलकर्णी ता.चंदगड येथील शाहू महाराजांच्या प्रचार सभेत न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या वतीने पाठिंबा जाहीर करत असल्याचे पत्र छत्रपती शाहू महाराज यांना दिले. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतेज पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, विजय देवणे,शिवाजीराव सावंत,जे. बी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, विष्णू गावडे, नितीन पाटील व महाविकास आघाडीतील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या भाषणात याबाबत आभार मानले. यावेळी न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन चे चंदगड तालुका अध्यक्ष संदीप सकट, तालुका संघटक संभाजी पाटील, किरण नागुर्डेकर, प्रसाद निटूरकर, परसू रेडेकर,सुमित रेडेकर, व चंदगड तालुका समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.