DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी: आरोपी पृथ्वीराज उर्फ भैय्या कांबळे राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी हा स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी पैशाचे आमीष दाखवून मातंग समाज मंदिराचे वॉल कंपाऊंड चे बाजूला उघड्यावर बसवून जुगार खेळण्यासाठी एकत्रित जमवून पत्त्याच्या पानाचा तीन पाणी जुगार खेळत असताना इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आदित्य मारुती दंडगे यांनी
त्या ठिकाणी खेळत असणाऱ्या प्रकाश गुरुपाद पाटील राहणार कवठेपिरान सांगली, शब्बीर युसुफ फनीबंद राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी, सचिन सुनील नगरकर वंदे मातरम मैदान जवळ इचलकरंजी, शाहरुख सय्यद घुणके राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी, व पृथ्वीराज उर्फ भैय्या कांबळे या पाचही आरोपीना खेळतांना पकडण्यात आले. त्यावेळेस त्यांच्याकडील रोख रक्कम व खेळातील रोख रक्कम असे एकूण रुपये 24800 मुद्देमालासह मिळून आलेने त्यांचे विरोधात फिर्यादी आदित्य मारुती दंडगे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सरकारतर्फे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12( अ ) गु. र.नं. ४७३/२०२४ असा गुन्हा नोंद केला असून तीन पाने खेळण्याचे पते व 24 हजार 800 रुपये रक्कम ताब्यात घेतली आहे.