DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय दिंडे / नारायण कांबळे
कोल्हापूर:- रहाते घराचा घरटान उतारा व मृत्यू दाखला देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले. यातील तक्रारदार यांनी त्यांचे सासरे यांचे रहाते घराचा घरटान उतारा व मृत्यू दाखला मिळण्यासाठी कार्यालयात मागणी केली होती. उतारा व मृत्यू दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे परखंदळे गावचे ग्रामविकास अधिकारी सचिन बाळकृष्ण मोरे राहणार जुने पारगाव तालुका हातकंणगले जिल्हा कोल्हापूर व साळवी पिशवी गावचे ग्रामविकास अधिकारी प्रथमेश रविंद्र डंबे राहणार जुने पारगाव तालुका हातकंणगले, जिल्हा कोल्हापूर या दोन्ही अधिकारी यांनी प्रथम 20,000 हजार रुपयेची मागणी केली. यामध्ये तडजोडी करून 5,000 रुपये ची मागणी केली. परखंदळेचे ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांचे सांगणेवरून साळशी पिशवी गावचे ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे यांनी तक्रारदार यांचेकडून 5000 हजार रुपयेची लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपी यांचेविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत विभागाच्या अधिकारी वैष्णवी पाटील व पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला यांनी माहिती दिली. सापळ्यामध्ये पोलिस हवालदार अजय चव्हाण, पोलिस नाईक सुधीर पाटील,
पोलिस कॉन्सटेबल कृष्णात पाटील,
चालक सहाय्यक फौजदार कुराडे
यांचे योगदान लागले.