DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संदीप सकट
चंदगड:- चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजनांचे लाभ मिळत असतात. तथापि या योजना परस्पर लाटल्या जातात. याला राजकीय नेते, खाजगी इसम, एजेंट व संबंधित अधिकारी यांच्याकडून खतपाणी मिळत असल्याचा आरोप करत या योजना चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वाईंगडे यांनी पाटणे फाटा येथे दि ९ ऑगस्ट क्रांतीदिना पासून सुरू केलेले उपोषण आज सहाव्या दिवशी १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्या लेखी परिपत्रकाने आश्वासनानंतर यशस्वी रित्या मागे घेण्यात आले.
राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात.त्यामुळे बांधकाम कामगार उपेक्षित व वंचित राहतात. जिल्यातील कोणत्याही खाजगी इंसम,एजेंट वा अनधिकृत कामगार नोंदणी केंद्र, CSC केंद्र यांच्याकडून पैशाची अथवा इतर लाभाची मागणी करीत असल्यास, बिगर कामगार बोगस कामगार नोंदणी करणे त्यांची आर्थिक पिळवणूक करणे यासर्व बाबी बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रार आल्यास उचित कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यावर चंदगड बाधकाम कामगार असोसिएशनचे अध्यक्ष बाबू चौगुले यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून भाई नारायण वाईंगडे यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी भाई बाबुराव कदम, सचिन जाधव, प्रकाश शिंदे, चंद्रकांत खोंद्रे, यांनी कोल्हापूर येथून मार्गदर्शन केले.उपोषणस्थळी प्रा. नागेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात आंदोलन यशस्वी झाल्याचे स्पष्ट करुन सर्व घटकांचे आभार मानले. भाई रवींद्र पाटील, समाजसेवक नरसू शिंदे, सुरुते पंचक्रोशीतील हणमंत बोंगाळे सह अनेक बांधकाम कामगार तसेच यल्लापा मुतकेकर विठ्ठल चव्हाण संजय गुंडप, वसंत कागणकर, भाई प्रसाद पाटील आदी मंडळी उपस्थित होती.