DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: अकील शहा
साक्री : – धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने गोवंश तस्करीवर मोठी कारवाई करून 19 गोवंशला जीवनदान देण्यात यश आले असून या प्रकरणात 12 लाख 91 हजारच्या मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईचे पिंपळनेर तालुक्यातून प्राणी मित्रांकडून कौतुक करण्यात येत आहे.
पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्री पेट्रोलिंग वर असणाऱ्या पथकास सूचना देऊन एक टाटा कंपनीची गाडी क्रमांक एम.एच. १८ ए.ए.०८४८ हिच्यात गायी कत्तलीसाठी निर्दयतेने भरुन घेऊन जात असल्याने कारवाई करण्यास सांगितले. ११/०१/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वाजेचे सुमारास पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात, सरकार हॉटेलचे पुढे रोडवर वळण रस्ता असलेल्या ठिकाणी सुमारे ०३.०० वा. चे सुमारास सापळा लावला असता सदर टाटा कंपनीची आयशर गाडी क्र. एम.एच. १८ ए.ए.०८४८ ही गाडयांचे लाईटाचे उजेडात येतांना दिसल्याने तीस बॅटरी मारुन थांबविण्याचा ईशारा केला असता सदर गाडी वरील चालक याने गाडी न थांबविता भरधाव वेगाने जावु लागला त्यानंतर लागलीच सदर गाडीचा पाठलाग करुन गाडी थांबवली. सदर गाडीची मागील बाजुस एक लाकडी व दोन लोखंडी पाटया लावलेल्या होत्या त्याचेवर चढून बॅटरी चालु करुन पाहीले व सदरची गाडी चेक केली असता सदर गाडीमध्ये गायी हया निर्दयतेने दोर बांधुन दिसल्या. सदर ठिकाणी रहदारी असल्याने व अंधार असल्याने सदरची गाडी ही पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणुन लाईटाचे उजेडात चेक केली असता सदर वाहनात कत्तलीचे उद्देशाने विविध वयाची 19 गोवंश जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजीत किंमत 2 लाख 91 हजार रुपये इतकी असून ताब्यात घेतलेले वाहन ची किंमत अंदाजे 10 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे या कारवाईत 12 लाख 91हजार रुपयाच्या मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पंकज दत्तात्रय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ड्रायव्हर एकलाक अजिज शेख वय ४५ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. इस्लामपुरा, नवापुर, ता. नवापुर, जि. नंदुरबार याच्या विरोधात भा.दं.वि. कलम २७९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७७ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (अ) चे उल्लंघन ९ व प्राण्याना निर्दयतेने वागणुक करण्यास प्रतिबंध करणे अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (च), (ट) प्रमाणे व मोटर वाहन कायदा कलम १९८८ चे कलम ६६ (१) १९२, १८४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पंकज दत्तात्रय वाघ , पोसई/ व्ही. आर. बहिरम, पोहेकॉ, अशोक.एस. पवार, चापोकॉ.एन. आर. परदेशी , पोहेकॉ राकेश बोरसे ,पोहेकॉ नरेंद्र परदेशी यांच्या पथकाने केले आहे.