नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पॅन कार्ड – २.० च्या नावाने होत असलेल्या फ्रॉडपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️


धुळे – सरकारतर्फे नुकतेच पॅन कार्ड २.० ची नवीन संकल्पना नागरीकांसाठी राबविण्याचे ठरले आहे आणि याचाच फायदा सायबर गुन्हेगार यांनी नागरीकांना फसवण्यासाठी घेतला आहे व सायबर गुन्हेगार हे सर्वसामान्य नागरीकांच्या नेहमीच एक पाऊल पुढेच असतात. “आता आम्ही सरकारच्या नवीन नियमानुसार आपले नवीन व अद्यावत असे पॅन कार्ड – २.० बनवून देणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुमची वैयक्तिक माहितीची आवश्यकता आहे, जेणेकरुन आम्ही तुमची माहिती नियमितपणे अपडेट करु शकू” असे सांगून नागरीकांना फसवण्याचा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. या पॅन २.० फ्रॉडमध्ये हे सायबर गुन्हेगार नागरीकांना सांगता की, आम्ही सरकारच्या नविन योजने अनुसार तुमचे नवीन ई- पॅन कार्ड २.० तात्काळ बनवून देवू. त्यासाठी आम्हाला तुमचे बँकेचे डिटेल्स लागेल तसेच तुमचे आधारकार्ड, जुने पॅन कार्डची संपुर्ण माहिती लागेल. जेणेकरुन आम्ही तुम्हाला त्वरीत पॅन कार्ड २.० तुमच्या पत्त्यावर व ईमेल वर उपलब्ध करुन देवू, असे सांगून सर्वसामान्य नागरीकांच्या वैयक्तिक माहितीच्या सहाय्याने हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक लुबाडणूक करतात. म्हणून सायबर अॅवरनेसचे फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांनी नागरीकांना असे आवाहन केले आहे की, नागरीकांनी अज्ञात लोकांकडून आलेल्या मॅसेजची / लिंकची पडताळणी करुनच त्यांना प्रतिसाद दयावा अन्यथा नागरीकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता राहील. तसेच सरकारच्या नविन योजनेनुसार पॅन कार्ड २.० ची माहिती आपण सरकारच्या अधिकृत पोर्टल वरुन प्राप्त करु शकतो. नागरीकांना सरकारतर्फे वैयक्तिक कॉल, ईमेल, लिंक पाठवली जात नाही व नविन योजनेनुसार पॅन कार्ड २.० हे नागरीकांच्या ईमेलवर किंवा दिलेल्या घरच्या पत्त्यावर सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज केल्याने आपोआप येणार आहे त्यासाठी तुम्हाला सरकारतर्फे कोणीही कॉल करणार नाही किंवा तुमची व्यक्तिगत माहिती विचारणार नाही ज्या लोकांची अशा पध्दतीने फसवणूक झालेली आहे त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrimebranch.com या पोर्टलवर जावून आपली तक्रार नोंदवावी.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
10:57 pm, December 22, 2024
23°
छितरे हुए बादल
Wind: 12 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:03 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!