DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: नंदकिशोर मेश्राम चंद्रपूर: पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळ च्या सुमारास उघडकीस आली. सुशील कुंबलवार (43) असे मृतकचे नाव असून ते राजुरा पोलीस स्टेशन ला कार्यरत होते. मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याचं परिसरात बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांनी घरी जावून चौकशी केली.