DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी — सतीश जिद्देवार
शांतता कमिटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..
हिमायतनगर :- शेतकऱ्यांचा पोळा हा सन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा शांततेत साजरा करावा. तसेच आगामी गौरी गणेशोत्सव व तसेच दुर्गात्सव काळात नुसते देखावे साजरे न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे. उत्सवाच्या काळात देण्यात येणारे समाज प्रबोधन संदेश महत्वाचे ठरतात. हिमायतनगर शहराची हिंदू – मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेऊन आगामी काळात होणारे धार्मिक सन उत्सव सर्वानी एकोप्याने साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले.
ते हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात गुरूवार दि. २८ दुपारी १२ वाजता तालुका दंडाधिकारी पल्लवी टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडुन अनेक महत्त्वपूर्ण सुचना देत असताना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वानीच घ्यावी असे अवाहन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला नगरपंचायत प्रशासनातील सिईओ, किंवा ऑफिस सुपिरेडेंट (ओएस) हजर नसल्याने अनेकांनी बैठकीत रोष व्यक्त केल्यानंतर तहसीलदार श्रीमती टेमकर यांनी व पोलीस निरीक्षक भगत यांनी आपण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दुसरी बैठक लावूनच नगरपंचायत अंतर्गतचे विषय निकाली काढू असे आश्वासन दिले.तसेच नागरिकांनी बैठकीत दुसऱ्या विषयावर चर्चा करण्याची संमती दिली. नगरपंचायत प्रशासनाकडुन पोळा या सनाच्या निमित्ताने मुस्लिम बाधवास पुरण पोळीचे भोजन देण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून बंद केली. हा विषय ऐरणीवर आल्यानंतर परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटीकडून भोजन व कमिटीची बैलजोडी मानाची राहील. असा ठराव पास करण्याची मागणी अनेकांनी लावून धरल्यानंतर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी परमेश्वर मंदिरातर्फे भोजन देण्यात येईल असे सांगीतले. हिंदू, मुस्लिम भाईचारा वृद्धिंगत करणारी ही प्रथा मोडता कामा नये. असे सांगून सर्वानी आगामी धार्मिक उपक्रम सन उत्सव एकोप्याने साजरे करून हिमायतनगर वाढोण्याची परंपरा अबाधित ठेवावी. जर हि परंपरा मंदिराकडे आल्यास प्रथा अविरतपणे चालू ठेऊ असे आश्वासन ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिले.यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आगामी काळात गणेशोत्सव व दुर्गात्सव हे महत्वाचे धार्मिक सन आपणाला साजरे करावयाचे आहेत. कुण्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण सर्वानी घ्यावी. प्रशासकीय यंत्रना सर्व प्रकारे सजग आहेत. आपण सर्वांनी धार्मिक सन उत्सव काळात जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती टेमकर यांनी केले. यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचा पुष्पहाराने सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्षयावेळी परमेश्वर मंदिराचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, माजी जि.प सदस्य समदखान पठाण, माजी तंटामुक्त अध्यक्ष अन्वरखान पठाण, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, जेष्ठ शिवसैनिक जफर लाला, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, नांदेड गोरक्षक जिल्हा प्रमूख किरण बिच्चेवार, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता फेरोज कुरेशी भाजपचे तालुकाध्यक्ष
आपण नवीनतम अद्यतनांवरकार्यकर्ता फेरोज कुरेशी, भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन चायल, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, संदिप तुप्तेवार, सदाशिव सातव, विलास वानखेडे, किशोर रायेवार, अश्रफखान पठाण, राम नरवाडे, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, श्याम जक्कलवाड, साहेबराव चव्हाण, अस्लम भांडेवाले, आकाश पाटील, लाईनमन परमेश्वर शिंदे, पंडित ढोणे, शुभम गाजेवार, सय्यद मनान, पोलीस पाटील सौ. मिराशे, विपूल दंडेवाड, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, अशोक अगुलवार, डिजीटल मिडीया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, धम्मपाल मुनेश्वर, नागेश शिंदे, नागोराव शिंदे, अनिल नाईक, आदींसह सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष व गणेश मंडळाचे पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.