DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- साईनाथ खंडेराय
बिलोली:- बिलोली तालुका सह इतर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळेमध्ये जनावरांची चोरी होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती.
मा. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर कार्यवाही तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अन्वय कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 20/12/2024 रात्री 2:00 सुमारास बिलोली पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बजरंग दल च्या टीमने बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती दिली दिलेल्या माहितीनुसार कार्ला फाटा येथे एक कळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची XUV 500 चार चाकी गाडी थांबलेली दिसली असता सदर वाहनाजवळ जात असताना सदर गाडी पोलिसांना पाहून बिलोली शहराकडे निघून गेली त्यावेळी बिलोली पोलिसांनी तात्काळ सदर गाडीचा पाठलाग करत असताना ती गाडी ईदगाह गल्ली बिलोली येथे जाऊन थांबली व त्यातील गाई चोरी करणारे आरोपी गाडी सोडून पळाले गाडी जवळ येऊन गाडीचे डोअर काडून पाहताच त्यामध्ये 6 गोवंश जातीचे जनावरे किंमत 1 लाख 12 हजार रुपये व चार चाकी किंमत 3 लाख रुपये असे एकूण 4 लाख 12 हजार रुपये मुद्देमाला सह गुर.ना.346/2024 कलम 303(2),3(5),IPC क्रमांक 2023 नुसार बिलोली पोलीस स्टेशन येथे दोन आरोपीवर व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळेस गावात सोडलेले गाई व शेतकऱ्यांचे गाई चोरून नेण्याचे काम काही चोरट्यांनी VIP गाड्या एका गाडीला दोन दोन असलेल्या चोरींच्या गाड्यांच्या वापर करून गाई चोरण्याचा काम करत होते ते चोरी केलेले गाई रात्रीच्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी गाईंची कतली होत होते त्या त्या ठिकाणच्या कसायांना त्यांनी त्या गाई विकून त्यांची कत्तल करून गोमास विकला जात होता अश्या कसायांना व चोरांना शिक्षा झालीच पाहिजे.
गाडीची चौकशी करत असताना गाडीमध्ये ब्रेडचे पुढे जनावरांना देण्यासाठी आणलेले बेशुद्धीचे इंजेक्शन असे साहित्य आढळून आले गाडी व जनावर ईदगाह गल्ली येथून पोलीस स्टेशन येथे घेऊन आले असता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जनावरांना सलाईन इंजेक्शन देऊन उपचार केले तर सहा जनावरां पैकी तीन गाई हे गाभण असल्याचे समोर आले त्यांना जास्तीचे औषध झाल्यामुळे बेशुद्ध आहेत शुद्धीत आले नाहीत ते दोन-चार तासांमध्ये शुद्धीवर येतील असे सांगून डॉक्टरांनी चार जनावरांना गोशाळे कडे पाठवले तर दोन जनावरे बेशुद्ध अवस्थेत बिलोली पोलीस स्टेशन येथेच होते.
दोन वर्षापासून जनावरे चोरी करून आणून त्यांची कत्तल करणाऱ्या चोर व कसायावर कार्यवाही शिक्षा होईल का असा प्रश्न जनतेला पडला आहे.
पुढील कार्यवाही ही पोलीस निरीक्षक अतुलजी भोसले हे करत आहेत.