DPT NEWS NETWORK 🗞️✍️
(सांगली प्रतिनिधी :- रमजान मुलानी)
कुपवाड :- जुन्या वादातून दोन गटात झालेल्या भांडणात राहुल मोहन नाईक या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करून फरार झालेल्या संशयितास कुपवाड पोलिसांनी अटक केली. नितीन वसंत दुधाळ (वय २२, रा. मायाक्कानगर, बामणोली) असे संशयिताचे नाव आहे. राहुल नाईक व संशयित नितीन दुधाळ, सुधाकर दुधाळ यांच्यात जुन्या कारणावरून वादावादी झाली होती. मंगळवारी दुपारी नितीन दुधाळ हा कोयता घेऊन राहुल नाईक याच्या घरासमोर थांबला होता. त्या कारणावरून दुधाळ व राहुल नाईक यांच्यात वादावादी झाली. संशयित नितीन दुधाळ व धोंडिराम दुधाळ यांनी राहुल नाईक व सुधाकर दुधाळ यांनी चाकूने राहुल नाईक याच्यावर वार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर संशयित नितीन दुधाळ हा फरार झाला होता. खून प्रकरणातील संशयित सुधाकर वसंत दुधाळ (वय २८) याला यापूर्वी कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे.