DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा / हेमंत महाले
साक्री : निजामपुर पोलीस स्टेशनला दिनांक १२/१०/२०२४ रोजी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांची पिडीत मुलगी वय – १६ वर्षे २० दिवस हिला दिनांक १०/१०/२०२४ रोजी शाळेचे बाहेरुन कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेले बाबत दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन- २९०/२०२४ भा. न्या.सं.का.- २०२३ चे क.१३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसताना सदर गुन्ह्याचा तांत्रीक
मदतीचे आधारे तपास करुन सदर अल्पवयीन मुलगीस आरोपी नामे सागर राजेंद्र गवळे रा. कोठली ता. शहादा जि. नंदुरबार
हा मांडवगण फराटा ता. शिरुड जि. पुणे येथे पळवुन घेवुन गेला आहे बाबत माहीती समजल्याने त्यास निजामपुर पोलीस
पथकाने मांडवगण फराटा ता. शिरुड जि. पुणे येथे जाऊन काल रात्री ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात वाढीव कलम भा.न्या. सं.
क. ६४(१) लैंगिक अपराधापासुन बालकांचे सरंक्षण अधिनियम २०१२ चे क. ४,८,१२ प्रमाणे वाढ करुन गुन्ह्यातील आरोपी नामे सागर राजेंद्र गवळे रा. कोठली ता. शहादा जि. नंदुरबार यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. किशोर काळे अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, एस.आर. बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि /श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि / मयुर एस. भामरे, पोउपनी/प्रदीप सोनवणे, पोउपनी / यशवंत भामरे, असई / संजय पाटील (नेम-स्थागुशा धुळे), पोहेकॉ / १२५४ नारायण माळचे, पोहेकॉ / ४१० आर. यु. मोरे, पोहेकॉ / १३६१ प्रदीपकुमार आखाडे, पोकॉ/१२५३ पृथ्वीराज शिंदे, पोकॉ /२८४ सुनिल अहिरे, पोकॉ / १४९५ परमेश्वर चव्हाण पोकॉ/ अमोल जाधव (नेम-स्थागुशा धुळे) यांचे पथकाने केली आहे.