DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी– साईनाथ खंडेराय
नांदेड :- मा. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आदेशीत केल्याप्रमाणे पोलीस स्टेशन हददीतील अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलुर चार्ज बिलोली गोसावी साहेब यांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब यांच्या आदेशानुसार रोज कुठं ना कुठं मास रेड पथकाच्या द्वारे व बिलोली पोलीस कर्मचाऱ्यांच्याद्वारे रेड मारणे चालू असताना सुद्धा दिनांक04/09/2024 रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथील पथकातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोशि/ 3120 माधव जळकोटे, पोह/ 2049 चंद्रकांत आंबेवार असे पोलीस स्टेशन हददीमध्ये गंजगाव शिवारामध्ये गस्त करीत असतांना सायंकाळी 20.30 वाजताचे सुमारास इसम नामे बाबन्ना सायन्ना राहेरकर वय 44 वर्ष व्यवसाय मजुरी रा. पोचमागल्ली, कुंडलवाडी, ता. बिलोली हा गंजगाव ते कुंडलवाडी जाणारे रोडवर आपल्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या पोत्यामध्ये देशीदारु भिंगरी, संत्रा असे लेबल असलेल्या 180 मि.ली क्षमतेच्या एकुण 96 बॉटल (खाकी रंगाचे दोन बॉक्स) बाळगलेला एकुण किंमती मुददेमाल 6720/- रु च्या मुददेमालासह मिळुन आल्याने नमुद इसमास ताब्यात घेवुन बिलोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 220/2024 कलम 65 ई महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक साहेब, अबिनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देगलुर चार्ज बिलोली गोसावी साहेब यांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक अतुल भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
बिलोली पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे चालु असल्यास बिलोली पोलीस स्टेशन येथे माहीती कळवावी.
राज्य उत्पादन शुल्कचे कार्यालय तालुका ठिकाणी काय शोभेची वस्तू बनलेली आहे की काय असं नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.